बेळगाव मधील प्रसिध्द रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गुरू रामदास स्वामी यांची रांगोळी काढली आहे.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही अनोखी रांगोळी रेखाटून
सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. रांगोळी दोन फूट बाय तीन आकाराची आहे. रांगोळी रेखाटण्या साठी लेक कलरचा वापर केला आहे. रांगोळी काढण्यासाठी त्यांना साठ 14 तास लागले आहेत. सदर रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ , वडगाव येथे दि.20 पासून 25 तारखे पर्यंत सकाळी 9 ते रात्रौ 8 पर्यंत सर्वांना पाहता येईल असे
अजित औरवाडकर यांनी कळवले आहे.