श्री मत् आद्य जगद्गुरु शंकराचार्य जयंती उत्सव चिदंबर नगर येथील श्री चिदंबर मंदिरात भक्तिमय वातावरणात साजरा झाला.संपूर्ण दिवसभर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.दिवसभर दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती.
सकाळी श्री लघुरुद्र अभिषेक, महापूजा, श्री शंकराचार्य कृत स्तोत्रांचे पठण, श्री शंकराचार्य स्तवन, पुष्पांजली,आरती,मंत्रपुष्प इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महाआरती झाल्यावर भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
या उत्सवात चार दिवस श्री चिदंबर मुनवळ्ळि यांनी श्री शंकराचार्य कृत विवेक चूडामणी या ग्रंथ आधारित प्रवचन केले.उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या साठी स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्तोत्र पठण स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. ड
डॉ.चंद्रशेखरशास्त्री जोशी. श्रीकांत जोशी, प्रा.संजीव कुलकर्णी, कलमेश भटजी यांनी उत्सवाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले