मारुती गल्लीतील मारुती मंदिरात असणाऱ्या अध्यापक घराण्याच्या प्राचीन श्री नृसिंह देवस्थानात श्री नृसिंह जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली.सकाळी मंदिरात श्री नृसिंह देवाला रुद्राभिषेक करण्यात आला.मंदिराचे ट्रस्टी प्रकाश अध्यापक आणि विलास अध्यापक यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला.
अलंकार सेवा झाल्यावर नैवेद्य दाखविण्यात आला.
महाआरती केल्यावर मंत्रपुष्पांजली झाली.यावेळी भक्तांना तीर्थ प्रसादाचे वितरण करण्यात आले.
संपूर्ण जगात शांती नांदावी.यावर्षी पाऊस चांगला पडूदे आणि बळीराजाची इच्छापूर्ती होवो तसेच सगळ्यांना सुख ,शांती, समाधान लाभुदे यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.पूजेचे पौरोहित्य वे.शा. सं. बाळू उर्फ नागेश देशपांडे यांनी केले.यावेळी चार्टर्ड अकाऊंटंट संजीव अध्यापक,निरंजन अध्यापक, महीप अध्यापक,सामाजिक कार्यकर्ते सुधीर मोरे आणि भक्त मंडळी उपस्थित होती.