This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

State

*एपीएमसी मार्केट यार्ड आर एम चौगुले यांना पाठींबा*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

एपीएमसी मार्केट यार्ड आर एम चौगुले यांना पाठींबा

 

बेळगाव ग्रामीणचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर एम चौगुले यांनी आपला पदयात्रा एपीएमसी मार्केट यार्ड येथे काढली यावेळी व्यापारांनी आपला पाठिंबा महाराष्ट्र एकीकरण समितीलाच असल्याचे जाहीर केले आणि बहुमताने समितीला निवडून आणून देऊ असा निर्धार व्यक्त केला.

यावेळी आर एम चौगुले यांचे स्वागत येथील व्यापाऱ्याने पुष्पगुच्छ देऊन केले त्यानंतर आर एम चौगुले यांनी आपल्या भाषणात मी ज्या मल्हार संघातून उभा आहे त्या ठिकाणी सर्वजण शेतकरी आहेत आणि हे शेतकरी वेळोवेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.

आता ही सर्व जण आपल्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल आणि येणाऱ्या निवडणुकीत ग्रामीणमध्ये समितीचा झेंडा फडकवाल असे सांगून समितीला पाठिंबा देण्याची विनंती केली.

यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी निवडणुकीकरिता आर एम चौगुले यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी महापौर शिवाजी सुंठकर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कायदा सल्लागार असोसिएशनचे उपाध्यक्ष सुधीर चव्हाण बसवंत मायानाचे मोहन बेळगुंदकर अशोक बामणे संजय चौगुले बाबुराव बामणे यांच्यासह मार्केट यार्ड परिसरातील व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now