ग्रामीण भागात फक्त क्लब आणि पबचा विकास:आ रमेश जारकीहोळी
ग्रामीण भागात मागील निवडणुकीपासून आतापर्यंत रस्त्याचा विकास तर रस्त्यावरील पब आणि क्लब चा विकास झाला आहे. अशी खोचक टीका भाजपचे रमेश जारकीहोळी यांनी काल जाहीर सभेत केली
सुळेभावी मध्ये काल रमेश जारकी होळी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी या मेळाव्यात त्यांनी लक्ष्मी अक्कावर घणाघाती, टिका केल्या आणि टीकास्त्र सोडले.
यावेळी त्यांनी ग्रामीण आमदारांची खिल्ली देखील उडवली तसेच म्हणाले की भेट वस्तूंवर कमीत कमी हजार रुपये खर्च करून काही होणार नाही मी कोणालाही पैसे न देता आज जी या ठिकाणी जनसभा जमली आहे त्यातच मी धन्य पावलो आहे आणि माझा विजयी झाले असल्याची प्रतिपादन यावेळी केले.
जनतेने स्पष्ट करून मला निवडणुकीत विजयी केले असे देखील यावेळी ते म्हणाले. तसेच आजपर्यंत आपण सहा वेळा निवडणूक जिंकली असल्याचे सांगून नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
त्यानंतर ते म्हणाले की आता लक्ष्मीला लक्ष्मी देवीलाच साकडे घालावे लागणार आहे हे त्यांचे दुर्दैव आहे. आपण निवडून येणार नाही याकरिता त्या नागरिकांना अमिष दाखवत आहेत. त्या जेवढा पैसा या निवडणुकीत खर्च करतील त्यापेक्षा अधिक दहा कोटी आपण खर्च करणार त्यांनी आयोजित केलेल्या जाहीर सभेत सांगितले तसेच म्हणाले की मी आता ग्रामीण मतदार संघ सोडणार नाही असे स्पष्ट केले.