*नाव स्मार्ट सिटी चे आणि काम निकृष्ट दर्जाचे*
कंगाळी खुर्द गावातील मुख्य रस्त्याचे व नाल्याचे काम स्मार्ट सिटी योजने अंतर्गत करण्यात आले होते पण पावसाळ्यातील परिस्थिती पाहता रस्ता व नाला करण्यापूर्वीची अवस्था ठीक होती असे वाटत आहे. कारण पावसाचे मुख्य रस्त्यावरील पाणी एपीएमसी मार्केट यार्ड पासून येऊन नाल्यात न जाता रस्त्यावरून येऊन मेन रोड सागर नगर क्रॉस येथे पाणी व कचरा साचून दुर्गंधी निर्माण होत आहे.
हे ग्रामपंचायत सदस्यांच्या लक्षात येतात केंप्पाना सननदी, वैजनाथ बेन्नाळकर, ज्योती पाटील ,मीना मुतगेकर, प्रशांत पाटील तसेच ग्रामपंचायत पीडीओ गोपाल नाईक व सेक्रेटरी रावजी फगरे यांनी स्वतः तिथं जाऊन कर्मचाऱ्याकडून साफसफाई करून घेतली व त्या परिसराला मोकळा श्वास दिला.