This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

National

*जिओ आणि एअरटेल च्या रिचार्ज प्लॅन किंमतीत झाली वाढ*

*जिओ आणि एअरटेल च्या रिचार्ज प्लॅन किंमतीत झाली वाढ*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

5 सप्टेंबर 2016 रिलायन्स जिओ ची लॉन्चिंग झाली मोफत अनलिमिटेड डेटामुळे सिम कार्ड घेण्यासाठी लोकांची अक्षरशः उडी पडली वॉडाफोन,एअरटेल या कंपन्यांचे सिम कार्ड लोकांनी जिओ मध्ये पोर्ट केलं पण अनलिमिटेड डेटाची सवय लोकांना लागली आणि परफेक्ट टाइमिंग हेरत जिओ ने दर जाहीर केले.लोकांना नाइलाजाने दर महिन्याला कंपनी सांगेल तेवढ्याच रिचार्ज करावं लागलं.आता देशात 5g आल्यानंतरही जिओ ने 4g च्या सिम पॅक मध्येच अनलिमिटेड 5g दिलाय लोकांना हायस्पीड डेटा वापरण्याची सवय लागली आहे.

पण हा मोफत अनलिमिटेड वापरलेला डेटा जिओ आणि एअरटेल या कंपन्या कसा वसूल करणार आहेत. नव्या रिचार्ज प्लॅन मुळे महिन्याला कसा खर्च वाढणार आहे.ऑक्टोबर 2022 पासून देशभरात 5g सेवेची सुरुवात झाली. देशात डिजिटल सेवा पुरवण्यात जिओ हे पहिल्या क्रमांकावर आहे. यात 5g सेवेचा विस्तार करण्यात जिओ ने मोठी भूमिका बजावली 3g किंवा 4g च्या तुलनेत 5g सेवा जलदगतीने देशभरात पोहोचली.सध्या साधारण 96% शहरात 5g च जाळ विस्तारलंय रिलायन्स कडून 5g च्या सेवेसाठी दोन लाख कोटींची गुंतवणूक केली गेली आहे.लोकांना 5g च स्पीड काय आहे.

ते कळावं यासाठी आधी 4g च्या पॅक मध्ये 5g अनलिमिटेड मिळालं पण जिओ ने हजारो कोटींची गुंतवणूक करून ज्या 5g ची अनलिमिटेड सेवा दिली. त्याचे दर आता जाहीर झालेत 28 दिवसांच्या 5g अनलिमिटेड टू जी प्लॅन ची किंमत 155 रुपये होती. आता 189 रुपये झाली आहे. 209 रुपयांच्या प्रतिदिन एक जीबी डेटा प्लॅनची किंमत 249 रुपये झाली आहे. 289 रुपयांच्या 15 gb प्रतिदिन डेटा प्लॅन ची किंमत आता 299 रुपये 299 च्या दोन जीबी प्रतिदिन डेटा प्लॅनची किंमत आता 349 रुपये 349 रुपयांच्या 25 gb प्रतिदिन डेटा प्लॅन ची किंमत आता 399 रुपये 399 रुपयांच्या तीन जीबी प्रतिदिन डेटा प्लॅनची किंमत 449 रुपये आता 56 दिवसांच्या 5g अनलिमिटेड प्रतिदिन 2 gb प्लॅन साठी 629 रुपये मोजावे लागणार आहेत. प्रतिदिन दोन जीबी डेटाच्या तीन महिन्यांच्या प्लॅन साठी आता 859 रुपये द्यावे लागणार आहेत.वार्षिक प्रतिदिन 25 gb च्या प्लॅन साठी 2999 रुपये आकारले जात होते. आता याच प्लॅन साठी जिओ कडून 3599 रुपये आकारले जाणार विशेष म्हणजे अनलिमिटेड 5g डेटा फक्त टू जीबी प्रतिदिन पॅक मध्येच असेल ज्याची किंमत 299 प्रति महिन्यापासून सुरू होणार आहे. टेलीकॉम कंपन्यांनी नवे प्लॅन देताना एक मेक मारून ठेवली आहे आणि ती म्हणजे तुम्हाला दररोज अनलिमिटेड डेटा पाहिजे तर किमान 300 रुपये तरी महिन्याला खर्च करावे लागतील जिओ पाठोपाठ airरटेल ने सुद्धा आपले प्लॅन जाहीर केलेत 28 दिवसांसाठी प्रतिदिन 1 gb डेटाची किंमत 265 वरून आता 299 वर पोहोचली आहे 28 दिवसांसाठी प्रतिदिन 15 gb डेटा प्लॅन ची किंमत 299 वरून 349 वर पोहोचली आहे 28 दिवसांसाठी प्रतिदिन तीन जीबी डेटा प्लॅन ची किंमत 399 वरून 449 वर गेली आहे 56 दिवसांसाठी दोन जीबी प्रतिदिन डेटा प्लॅन ची किंमत 549 वरून 649 झाली आहे 84 दिवसांच्या दोन जीबी प्रतिदिन डेटा प्लॅन ची किंमत 849 39 वरून 979 रुपयांवर पोहोचली आहे.

दोन जीबी प्रतिदिन डेटाच रिचार्ज केलं तर अनलिमिटेड 5g मिळणार आहे पोस्टपेड प्लॅन मध्येही 50 ते शंभर रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे 5g नेटवर्कची किंमत जास्त असली तरी त्याचे फायदेही आहेत आणि त्यामुळेच हाय स्पीड डेटाची गरजही वाढली आहे 5g नेटवर्कचा वेग 4g पेक्षा दहा पटीने असणार आहे 5g स्पीड मुळे तीन तासाचा चित्रपट अवघ्या तीन मिनिटात डाऊनलोड होईल व्हिडिओ कॉल क्वालिटी सुधारणार आहे तर कॉल ड्रॉप ची समस्या देखील संपण्यास मदत होईल फाईव्ह जी नेटवर्क आल्यावर ऑटोमेशन चा वेगही वाढणार आहे. मोठमोठ्या शहरात असलेल्या गोष्टी गावागावात पोहोचण्यास मदत होईल व्यापार शिक्षा आरोग्य आणि कृषी सारख्या क्षेत्रात 5g मुळे क्रांती घडेल घरातील फ्रीज,टीव्ही,मायक्रोवेव्ह ओव्हन मशीन,एसी सारख्या वस्तू इंटरनेटशी जोडल्या जातील आता रिलायन्स जिओ असो की एरटेल महिन्याच्या रिचार्ज पासून ते वर्षभराच्या रिचार्ज मध्ये भरघोस वाढ करून या कंपन्यांनी 5g ऑक्शन मध्ये गुंतवणूक कशासाठी केली होती. हे दाखवून दिलंय पण दूरसंचार कंपन्या जेव्हा कोणतीही सेवा मोफत देतात तेव्हा त्याची वसुली ही त्याच पद्धतीने काही दिवसातच केली जाते हे आपण यातून शिकलं पाहिजे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24