ग्रामीण शिक्षण अभियानअंतर्गत ‘आॕपरेशन मदत’ ग्रूपच्यावतीने विद्यार्थीनींना शैक्षणिक मदत. –
‘आॕपरेशन मदत’ ग्रूपच्यावतीने सरकारी शाळेत (सरदार हायस्कूल) शिकणाऱ्या दोन विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. डाॕ सुरेखा पोटे मॕडम व पीएसआय श्वेता मॕडम यांच्या हस्ते सदर शैक्षणिक साहित्य देण्यात आले, यावेळी डाॕ अनिल पोटे व कौस्तूभ पोटे उपस्थित होते.
राहुल पाटील यांनी ‘आॕपरेशन मदत’ ग्रूपच्यावतीने खानापूर तालुक्यातील जंंगलातील दुर्गम खेड्यातील शाळेत शिकणाऱ्या काही गरजू विद्यार्थ्यांना ग्रामीण शिक्षण अभियानअंतर्गत शैक्षणिक साहित्य वितरीत करणार आहोत, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.