This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*रोटरी क्लब ऑफ बेळगांव दर्पण तर्फे मण्णूर ग्राम दत्तक*

*रोटरी क्लब ऑफ बेळगांव दर्पण तर्फे मण्णूर ग्राम दत्तक*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जागतिक स्तरावर रोटरी क्लब ही एक समाजसेवेसाठी सतत झटणारी, सतत कार्यरत असणारी संस्था आहे. नेहमीच समाज विकासाच्या कामात रोटेरी क्लबचे योगदान मोठे असते. तळागाळातील समाजासाठी रोटरीतर्फे राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. शिक्षण, आरोग्य, कृषी, जलसंवर्धन, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील रोटरीचे काम वाखाणण्याजोगे आहे.

Dist. 3170 म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या तीन राज्यांत जे रोटरी क्लब आहेत त्यात अगदीच हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच महिला क्लब आहेत. त्यातीलच एक म्हणजे रोटरी क्लब ऑफ बेळगांव दर्पण.

रोटरी दर्पणचा खरा उद्देश म्हणजे गरजू महिलांना सक्षम बनवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून स्वयंपूर्ण बनविणे. त्यासाठी महिला तसेच मुलींना देखील आत्ताच्या जगाबरोबर राहण्यासाठी संगणक प्रशिक्षण, शिलाई मशिन प्रशिक्षण व वाटप, गरजू मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल वाटप, त्याचबरोबर हे सारे करत असतानाच समाजातील आणखी गरजा लक्षात घेऊन गरजू बांधवांना परिपूर्ण मदत करून त्यांना समाजामधे ताट मानेने जगण्यासाठी सहाय्य करणे.

रोटरी क्लब ऑफ बेळगांव दर्पण 2024-25 चे  ध्येय म्हणजे चलो मिलकर कदम बढाएं, गांव को सुजलाम सुफलाम बनाएं शहरी भागामध्ये बऱ्याच अशा संस्था आहेत.ज्या समाजासाठी कार्यरत असतात पण ग्रामीण भाग बऱ्याच सुविधांपासून वंचित असतो. त्यासाठीच आम्ही यावर्षी मण्णूर ग्राम दत्तक घेऊन त्या गावचा सर्वांगीण विकास करून, कायापालट करून एक सुंदर ग्राम अशी प्रतिकृती करण्याचा मानस केलेला आहे.

त्यामध्ये विध्याथींच्या शिक्षणाला प्रोत्साहन व त्याांना त्यासाठी आवश्यक ती मदत, महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्याना सक्षम बनविणे, आरोग्याची काळजी याच्या माध्यमातून कॅन्सर सारख्या असाध्य रोगाबद्ल समाजामधे जागृती करून, तपासणी करून जर कोणी पिडीत असेल तर त्यावर वेळेतच उपचार करून औषधोपचारासाठी सहकार्य करणे, Happy School च्या अंर्तगत गावातील शाळेमधील गरजा ओळखून त्या पूर्ण करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे
महत्त्व पटवून देवून त्यांना प्रोत्साहन देणे.

समाजामधे वावरत असताना त्याचे आपण काहीतरी देणे लागतो ही गोष्ट विद्यार्थ्यांना शिकवून त्यांना पर्यावरणाबद्दल आपुलकी कशी जोपासावी यासाठी विविध उपक्रम, नाईट स्कूल ची संकल्पना सुचवून शिक्षणापासून वंचित अशा महिलांना सुशिक्षित बनविण्याचा प्रयत्न असे उपक्रम राबविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

1 जुलै 2024 या दिवशी रोटरी क्लब ऑफ बेळगांव दर्पणचे प्रांतपाल रो. शरद पै यांच्या शुभहस्ते व AG रो. महेश बेल्लद, क्लब च्या अध्यक्षा रो. रूपाली जनाज, सेक्रेटरी रो. शितल चिलमी, event chair रो. कावेरी करूर, क्लबच्या सर्व सदस्या, मण्णूर ग्राम पंचायत अध्यक्ष श्री. मुकुंद तरळे, श्री. आर.एम.पाटील यांच्या उपस्थितीत दत्तक समारंभ पार पडला. खरं तर हा आमच्यासाठी ‘लहान तोंडी मोठा घास’ असा प्रयत्न आहे. पण समाजामध्ये खूप असे दानशूर व्यक्ती आहेत जे सतत समाजाच्या हितासाठी प्रयत्नशील असतात, असे जे कोणी दानी अशा चांगल्या कामासाठी हातभार लावू इच्छितात त्यांचे आम्ही नेहमीच स्वागत करतो.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24