आपले दिर,जाऊ आणि पुतण्या मालमत्ता हडपण्यासाठी मंत्र तंत्र आणि काळी जादू करत असल्याची तक्रार बेळगावातील माजी खासदारांच्या सुनेने कॅम्प पोलीस स्थानकात केली आहे.दीपा सिदनाळ या बेळगावचे दिवंगत खासदार एस.बी सिदनाळ यांच्या स्नुषा असून प्रख्यात व्ही आर एल ग्रुपचे संस्थापक विजय संकेश्र्वर यांच्या कन्या आहेत.
जादू टोणा ,मंत्र तंत्र आणि काळी जादू करून माझ्या पतीचा बळी घेतला असून आता ते विजयकांत डेअरी आणि अन्य मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करत आहेत असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.अनोळखी व्यक्ती येते आणि आपल्या घराजवळ लिंबू आणि अन्य साहित्य ठेवून जाते.शशिकांत सिदनाळ त्यांची पत्नी वाणी
मुलगा दिग्विजय आणि अन्य एका अनोळखी व्यक्ती विरोधात दीपा सिदनाळ यांनी तक्रार नोंदवली आहे.पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीमुळे सगळीकडे हा चर्चेचा विषय झाला आहे.भा दं वि कलम १२० बी,५०६,३७ तसेच काळी जादू प्रतिबंधक कायदा २०१७ नुसार कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.