कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखेची झाली घोषणा
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारीखेची घोषणा केली आहे.
कर्नाटकात होणारी विधानसभा निवडणूक येत्या 10 मे 2023 रोजी मतदान होणार आहे तर 13 मे 2023 रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर आजपासून निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.सरकारचा कार्यकाळ 14 मे रोजी संपणार असून 23 मे पर्यंत नवीन सरकार स्थापन होणार आहे.
कर्नाटकात एकूण 5 कोटी 21 लाख मतदार आहेत. तसेच एकूण मतदान केंद्र 58,282 आहेत. यामध्ये महिला पुरुष आणि इतर मतदारांचा समावेश आहे.
निवडणुकीची अधिसूचना 13 एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे. तर 21 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर दहा मे रोजी निवडणूक होणार असून 13 मे रोजी निकाल लागणार आहे.