बेळगांव,दिनांक 14 जून 2024 रोजी बेळगाव जिल्हा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद तर्फे आज चव्हाट गल्ली येथे बेळगाव के. के. एम.पी. जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांच्या कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली.
या सभेमध्ये बेळगावातील सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी या विशेष सभेमध्ये सहभागी झाले होते. प्रमुख म्हणजे मराठा समाजाच्या शिक्षणासाठी, विकासासाठी आणि उन्नतीसाठी सभा घेण्यात आली होती. बेळगावमध्ये सदाशिव नगरमधील 22 गुंठे जमीन माजी मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्माई आणि माजी मुख्यमंत्री श्री.बी.एस. येडीयुराप्पाजी यांनी लीज वर दिली आहे. आता जिल्हाध्यक्ष म्हणून अनिल बेनके पुढाकार घेऊन सर्व बेळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व प्रमुख नेते मंडळी यांचा सल्ला घेऊन मराठा भवन बांधण्याची जबाबदारी घेण्यात आली. आणि याच संदर्भात जिल्ह्यातील सर्व के. के. एम.पी. पदाधिकारी बैठक दिनांक 26-06- 2024 रोजी करण्याची ठरवली, या प्रकल्पात सर्व पदाधिकाऱ्यांनी मनापासून सहभागाचे आश्वासन दिले आहे. बेळगाव जिल्ह्यात 15 लाख मराठा समाज असून, विखुरलेल्या समाजासाठी करण्याचे काम मोठे आहे. सर्व मराठा समाज बांधवांना एका छताखाली आणून समाजाला बळकटी देण्याचे काम के. के. एम.पी. ने हाती घेतले आहे.
यावेळी बेळगाव के. के.एम.पी. जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांच्या समवेत दिलीप पवार खानापूर जिल्हा उपाध्यक्ष के. के. एम.पी., बसवराज म्यॅगोटी, संजीव भोसले, डी. बी. पाटील अध्यक्ष बेळगाव तालुका उचगाव, एस. व्ही. जाधव कार्यदर्शी बेळगाव तालुका उचगाव, मनोज पाटील दक्षिण बेळगाव, प्रमोद बी. गुंजीकर दक्षिण बेळगाव, रोहन कदम उपाध्यक्ष बेळगाव तालुका, सुरेश पाटील खानापूर, राहुल पवार खानापूर आदी उपस्थित होते.