मार्कंडे सहकारी साखर कारखान्यासाठी दोन पॅनल मध्ये होणार निवडणूक
27 ऑगस्ट रोजी म्हणजे रविवारी मार्कंडे सहकारी साखर कारखान्यासाठी निवडणूक होणार आहे मात्र दोन दिवसांपासून सुरू असलेली बोलणे सध्या विस्कटली असल्याने सत्ताधारी गटात दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता मार्कंडेय साठी दोन पॅनल बुधवारपासून प्रचार करत आहेत.
अध्यक्ष अविनाश पोतदार आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी वेगवेगळे पॅनल तयार केले असून त्यांच्यात निवडणूक होणार आहे कारखान्याच्या सत्ताधारी गटातर्फे एकच पॅनल करण्यात येत होते मात्र बुधवारी येथील गटात फूट पडली असून आता दोन वेगवेगळे पॅनल तयार झाले आहेत.
यामध्ये शेतकरी बचाव पॅनल सामान्य गटातून ज्योतिबा आंबोळकर भाऊराव पाटील मल्लाप्पा पाटील रामचंद्र पाटील शिवाजी कुट्रे सिद्धाप्पा ठोंबरे संभाजी चौगुले अनुसूचित जाती जमाती गटातून परसराम कुलकार अनुसूचित जाती जमाती गटातून लक्ष्मण नाईक ओबीसी गटातून बसवराज ओबीसी ब गटातून तानाजी पाटील महिला गटातून वनिता अगसगेकर वैष्णवी मुळीक सहकारी संस्था गटातून सुनील अष्टेकर आणि बिगर ऊस उत्पादक गटातून बाबासाहेब भेकणे उभे आहेत.
तर अविनाश रामभाऊ पोतदार पॅनल गटातून अनिल कुत्रे अनिल पावशे बसवंत मायानाचे अविनाश पोतदार अशोक नाईक बाबुराव पिंगट अनुसूचित जाती जमातीतून चेतक कांबळे अनुसूचित जाती जमाती गटातून सत्यपाल मुचंडी ओबीसी वर्गातून उदय सिद्ध्यांनावर ओबीसी ब गटातून मनोहर हुकेरीकर महिला वर्गातून नीलिमा पावशे वसुधा म्हाळोजी सहकारी संस्था गटातून प्रदीप अष्टेकर आणि बिगर ऊस उत्पादक वर्गातून भरत शानभाग उमेदवार उभे आहेत.
याकरिता तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बच्छाव पॅनलची बैठक सदाशिवनगर येथे पार पडली त्यानंतर संचालक आर आय पाटील आणि माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी आपल्या पॅनल बाजू मांडली व आपण निवडणुकीत सामोरे जात असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.
यावेळी ते म्हणाले की अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी मंगळवारी रात्रीपर्यंत असकारात्मक प्रतिसाद दिला नाही त्यामुळे आम्ही संचालक मंडळाची निवड बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही पण आता तानाजी पाटील यांना पॅनेल मध्ये घेण्यात येऊ नये अशी भूमिका त्या गटाने घेतली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही वेगळा पॅनल तयार करून लढविण्याचे ओल्या असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
आर आय पाटील म्हणाले की शेतकऱ्यांसाठी उभा केलेला हा कारखाना आहे हा लीजवर देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हा प्रयत्न तानाजी पाटील आणि इतर संचालकांनी हाणून पाडला आहे त्यामुळे ही संचालक कारखान्यात त्यांना नको आहेत रामभाऊ पोतदार गुरुवांना कुत्रे आणि शट्टूपा पाटील यांच्या प्रयत्नाने सुरू झालेला हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे त्यामुळे शेतकरी पॅनल करून ही निवडणूक लढणार आहोत अशी माहिती आर आय पाटील यांनी दिली.
त्यामुळे मार्कंडेय साठी आता दोन पॅनल ठरले असून बुधवारपासून त्यांचा प्रचार सुरू झाला आहे.