कर्नाटक वीज नियामक आयोगाने (केईआरसी) गेल्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये वार्षिक कार्यवाही केली आणि एस्कॉमचे प्रस्ताव, लोकांचे मत आणि २२ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, घरगुती वीजेवर १ रु. १० पैशांची कपात होणार आहे.
यामुळे राज्यात पंधरा वर्षांनंतर प्रथमच वीज वापर दरात कपात करण्यात आली आहे. दर कपात आजपासून लागू होणार असून मे महिन्यात देण्यात येणाऱ्या बिलाना ती लागू होणार आहे.
पूर्वी १ ते १०० युनिटपर्यंत घरगुती विजेचे दर चार रुपयांपेक्षा जास्त होते. १०० युनिटपेक्षा अधीक वीज वापरावर प्रति युनिट सात रुपये दर होता.तर आता घरगुती वीजेवर १ रु. १० पैशांची कपात होणार आहे.
कर्नाटक विद्युत आयोगाने ६४,याआधारे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, रुग्णालय, शैक्षणिक संस्था, पाटबंधारे, अपार्टमेंट, औद्योगिक प्लांट अशा विविध पातळ्यांवर वापरल्या जाणाऱ्या विजेचे दर कमी करण्यात आले आहेत.
अपार्टमेंटसह वाणिज्य, उद्योग, खासगी रुग्णालये व शिक्षण संस्थांचे मागणी शुल्क प्रति किलोवॅट १० रुपये कमी करण्यात आले आहे.
तर एलटी घरगुती वापरासाठी – १.१० रुपये एचपी वाणिज्य – १.२५ रुपये एचटी उद्योग ५० पैसे एचटी हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था ४० पैसे खासगी सिंचन २ रुपये खासगी रुग्णालय, शैक्षणिक संस्था ५० पैसे औद्योगिक आस्थापने १ रुपयांचा वाणिज्य अस्थापने ५० पैसे कमी करण्यात आलेत