अंकली : मुलांना पोहायला शिकविताना शेततळ्यात बुडून वडिलांसह दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रायबाग तालुक्यातील निडगुंदी येथे घडली. याप्रकरणी रायबाग पोलिस स्थानकात नोंद झाली आहे. कल्लाप्पा बसप्पा गानगीर (वय ३६) मनोज (वय ११) व मदन(वय ९) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, निडगुंडी (ता. रायबाग) येथील शेतकरी कल्लाप्पा गानगीर आपल्या दोन मुलांना पोहायला शिकवत असताना दोन मुलांसह त्यांचाही बुडून मृत्यू झाला. घटनास्थळी रायबाग पोलिसांनी पाहणी केली.