This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*प्रार्थनास्थळाच्या जागेच्या वादातून अनगोळमध्ये दोन गटात हाणामारी*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रार्थनास्थळाच्या जागेच्या वादातून अनगोळमध्ये दोन गटात हाणामारी

बेळगाव:राजहंस् गल्ली, अनगोळ येथे शनिवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली आहे. एका युवकावर चाकू हल्लाही करण्यात आला असून यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात परस्परांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वाडा कंपाऊंडजवळील पंजा मशीदसमोर ही घटना घडली आहे.

जहेद दफेदार (वय २४) रा. रघुनाथ पेठ, अनगोळ या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून सर्फराज मुल्ला, अझरुद्दीन मुल्ला यांच्यासह २१ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर अझरुद्दीन मुल्ला (वय ३७) रा. राजहंस गल्ली, वाडा कंपाऊंड, अनगोळ याने दिलेल्या फिर्यादीवरून जहेद दफेदार, मुस्तफा खडकवाले व सफीउल्ला यादवाडकर या तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रार्थनास्थळाच्या जागेच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.

हाणामारी व चाकू हल्ल्यात दोन्ही गटातील तिघे जण जखमी झाले आहेत. अहेमदरजा मुल्ला (वय २३), अझरुद्दीन मुल्ला (वय ३७) दोघेही रा. राजहंस गल्ली, वाडा कंपाऊंड व जहेद दफेदार (वय २४) रा. रघुनाथ पेठ, अनगोळ अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेनंतर अनगोळ परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक कपिलदेव ए. जी. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेनंतर रात्री अनगोळ परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला होता.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now