बेळगाव मध्ये घराणेशाहीतच राजकारण सुरू आहे. त्यामुळे इतर कार्यकर्त्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी कार्य करून मंत्रांच्याच मुलांना उमदेवारी दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे .
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मुलाला बेळगाव मतदार संघातून लोकसभा निवडणुकी करिता काँग्रेसने तिकीट दिले आहे तर चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून मंत्री सतीश जारकीहोळी यांनी त्यांची मुलगी प्रियांका जारकीहोळी यांना उमेदवारी दिली आहे.
त्यामुळे लोकसभा निवडणुक ही कोणत्या वेगळ्या पक्षात नाही तर घराणे राजशाहीत होत असल्याचा वादग्रस्त मुद्दा सध्या उपस्थित झाला आहे.
माजी आमदार रमेश कुडची यांनी आपल्याला तिकीट मिळावे याकरिताअर्ज दिला होता. तसेच चिक्कोडी मतदार संघातून लक्ष्मण चिंगळे यांना उमेदवारी मिळायला हवी होती .
मात्र काँग्रेसने त्यांना बुडाचे अध्यक्ष पद देऊन त्यांना शांत बसविण्याचे काम केले आहे. आणि रणरीती आखून चिक्कोडी संघातून प्रियांका जारकीहोळी यांना उमेदवारी देऊ केली आहे. तसेच अनेक इच्छुक उमेदवारांचे तिकीट कापले असल्यास ची नाराजी यावेळी बोलताना रमेश कुडची यांनी व्यक्त केली आहे.