https://www.instagram.com/reel/C7omEwehGr7/?igsh=bzczc3B3OXlpM3c0
बेळगाव:आज विद्यार्थी पालक वर्गाचे प्रारंभोत्सवानिमित्त मराठा मंडळ संचलित जिजामाता हायस्कूल,सेंट्रल हायस्कूल व मराठा मंडळ हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात पार पडण्यात आला. प्रारंभी तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग यांच्या हस्ते नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.तर पालकांचे गुलाब पुष्प देऊन त्यांचेही स्वागत करण्यात आले.
त्यानंतर आयोजित छोट्याशा कार्यक्रमात तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व पालक यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. जिजामाता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी इशस्तवन व स्वागत गीत सादर केले. जिजामाता हायस्कूल मधून सन 2023-24 सालच्या एस.एस.एल.सी परीक्षेत 97% टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी ऐश्वर्या कुडचीकर सत्कार करण्यात आला.
सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री व्ही एस हसबे यांनी एक हजार रुपये रोख बक्षीस देऊन तिचा सन्मान केला.उपस्थित असलेल्या काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.सहशिक्षक डी.टी.सावंत, बी. एम.पाटील,जी.बी.पाटील यांनी शाळेबद्दल मनोगत व्यक्त केले. तसेच तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुक्त बी.एस. हसबे,श्रीयुक्त.एन.डी.पाटील श्रीमती एल.एन.शिंदे यांनी नव्याने शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे आपल्या मनोगतातून स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ए.एस.पवार यांनी केले तर प्रास्ताविक एस.के.जाधव यांनी केले.