केएलएस जीआयटी मध्ये “इंटरनेट ऑफ थिंग्स” वर पाच दिवसीय कार्यशाळा यशस्वीरितेने संपन्न
बेळगावी, कर्नाटक २९ मे, २०२४: केएलएस गोगटे इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि च्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कॅम्प्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाने टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स युनिव्हर्सिटी पार्टनर असलेल्या स्टेप नोलेज सर्विस लिमिटेड, कोइंबत्तूर यांच्या सहयोगाने “इंटरनेट ऑफ थिंग्स” या विषयावर २१ ते २५ मे, २०२४ दरम्यान पाच दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले.
श्री व्ही.एस. रमेश, स्टेप नोलेज सर्विस लिमिटेड. चे संचालक, या कार्यशाळेचे विषय तज्ज्ञ होते. त्यांनी सहभागींना आयओटी, मायक्रोकंट्रोलर्स, संवेदकांचा वापर, नोड प्रोग्रामिंग, संवाद प्रोटोकॉल्स आणि रोबोटिक्स अॅप्लिकेशन्स या विषयांवर सैद्धांतिक आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान केले.
केएलएस जीआयटी मधील डॉ. मंजुनाथ एम, डॉ. रमेश कोटी आणि प्रा. निखिल इनामदार यांनी या कार्यशाळेचे समन्वय साधले. कार्यशाळेत ६० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि प्राध्यापक सक्रिय सहभागी झाले. इलेक्ट्रॉनिक्स आणि कॅम्प्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख डॉ. सुप्रिया शानभाग आणि प्राचार्य डॉ. एम.एस. पाटील
यांनी कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केलेल्या संघाचे अभिनंदन केले.