मनोरमा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्याकडून प्रा.आनंद मेणसे यांनी केलेल्या पत्रकारितेबद्दल व साहित्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल साधना क्रीडा संघ यांच्या वतीने ज्येष्ठ सदस्य श्री प्रकाश देसाई यांच्या हस्ते प्राचार्य आनंद मेणसे यांचा शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच साधना क्रीडा संघाचे खेळाडू कु. आदित्य पाटील हा खेलो इंडिया कर्नाटक राज्य संघामधून तामिळनाडू येथे खेळल्याबद्दल तसेच कु. सुयश पाटील हा सीनियर नॅशनल कर्नाटक संघामधून दिल्ली येथे खेळल्याबद्दल यांचा काॅ. कृष्णा मेणसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला साधना क्रीडा संघाचे प्रकाश नंदिहळी, शैलेस बांदिवडेकर, परशराम यळ्ळूरकर, अजित भोसले, विवेक पाटील, अशोक हलगेकर, सतिश बाचीकर, पी, ओ, धामणेकर तसेच सदस्य व खेळाडू उपस्थित होते.