विश्व भारत सेवा समिती बेळगावची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शारदा प्रमोद चिमडे या होत्या. तसेच संस्थेचे सचिव प्रकाश नंदीहळी, श्री निगोंजी पार्लेकर आणि श्री पूण्णाप्पा नाईक यांच्या मार्गदर्शना खाली सभा पार पाडली. या वार्षिक सभेचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी यांनी केले. तसेच संस्थेचा वार्षिक अहवाल, जमाखर्चा व मागील वर्षाच्या सभेच्या वृत्तांताचे वाचन केले.
तदनंतर मागील वर्षाच्या वृत्तांतला व जमाखर्चाला सर्व सभासदांनी टाळ्याच्या गजरात मंजूरी दिली. त्यानतंर वार्षिक अहवालावर खेळीमेळीत चर्चा झाली. तसेच पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रा. स्मिता मुतगेकर यांनी काॅलजच्या विकासाबद्दल माहिती सांगितली. यानंतर बि. बि. शिंदे व पि. आर. गोरल यांनी संस्थेला मार्गदर्शन करत मनोगत व्यक्त केले. या बैठकीला संस्थेचे पदाधिकारी, संचालक, सर्व सदस्य व पंडित नेहरू पदवी पूर्व कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन मयूर नागेनहट्टी आणि आभार प्रदर्शन सी. एम्. गोरल यांनी केले.