उद्यमबाग, ता. १० : श्री विश्वकर्मा सेवा संघातर्फे पाचवी ते दहावी तसेच पदवीधर, खेळाडू मुलामुलींचा सत्कार रविवारी (ता. ९) उद्यमबाग येथील – सिलिब्रेशन हॉल येथे करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून लघु उद्योग भरती संघटनेचे कर्नाटक राज्याध्यक्ष सचिन सबनीस, भारत देशपांडे उपस्थित होते.
व्यासपीठावर प्रमोद मुचंडीकर, कृष्णा बिंदले, मूर्तिकार रवी लोहार, इब्राहिम माणगावकर, सुनील सुतार, वासुदेव बडीगेर, मीना बेनके, विनायक सुतार आदी होते. श्री विश्वकर्मा सेवा संघ व महिला सेवा संघातर्फे हा कार्यक्रम झाला. सानिका गजानन लोहार या अंध विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण घेतल्याबद्दल उद्योजिका रत्ना सुतार यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. किरण बसवराज कम्मार यांनी एमबीबीएसची पदवी प्राप्त केल्याबद्दल अध्यक्ष रमेश देसूरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. संपदा सुतार हिने दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के, दयानंद महेश सुतार याने बी. ई. मेकॅनिकल इंजिनियरिंगला ८५ टक्के गुण घेतल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला उपाध्यक्ष जोतिबा लोहार, राजू सुतार, संदीप मंडोळकर, नामदेव लोहार, किरण सुतार, मारुती सुतार, पप्पू लोहार, श्रीधर सुतार, प्रशांत बेळगावकर, प्रकाश कम्मार, नीलेश लोहार, अध्यक्षा दिव्याश्री सुतार, नेहा देसूरकर, रेणुका सुतार, गीता लोहार, पूजा लोहार, तेजस्वी लोहार, नंदा देसूरकर, संपदा बेळगावकर, प्रज्ञा चिंचणेकर, लक्ष्मी गुरव आदींसह संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.