बेळगाव जिल्ह्यातील विविध दलित संघटनांच्या च्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांना राज्याचे उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणी आज पत्रकार परिषद मध्ये केली.
यावेळी सदर पत्रकार परिषद एका खाजगी हॉटेलमध्ये पार पडली यावेळी बोलताना दलित नेते मल्लेश चौगुले म्हणाले की सतीश जारकीहोळी हे हुशार विचारे साधे गृहस्थ आहे ते काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत बेळगाव जिल्हा उत्तर कर्नाटक तसेच कर्नाटकातील प्रभावशाली दिग्गज त्यांपैकी ते एक आहेत त्यांनी सुमारे 30 ते 40 वर्षे सामाजिक कार्य स्वतःला झोकुन दिले आहे आणि आपल्या श्रमातून अनेक गरीब कुटुंबांना आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय मिळवून दिला आहे खेळाडूंसाठी सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा उपक्रम आणि विकास साधण्यासाठी ते सातत्याने भरीव कार्य करत आहेत.
त्यामुळे सरकारने सतीश जारकीहोळी यांना राज्याचे उपमुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी यावेळी दलित समाजाच्या सदस्यांनी केली. सतीश जारकीहोळी हे केपीसीसीचे कार्याध्यक्ष झाल्यापासून त्यांनी अनेक समाज उपयोगी कार्य करून बहुजन समाजासाठी योगदान दिले आहे त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी त्यांनी केली.