काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी कडोली गुंजेनहट्टी देवगिरी या भागात झंजावती प्रचार केला. यावेळी नागरिकांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.
प्रारंभी प्रियंका जारकीहोळी यांनी आपल्या समर्थकांत समवेत चिकोडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या देवगिरी येथून आपल्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी गावकऱ्यांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्या प्रारंभी त्यांचे औक्षण आणि पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रियांका जारकीहोळी बोलताना म्हणाल्या की मला मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांनी तिकीट देऊन चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे.मला या संधीचे सोने करायचे आहे. यासाठी मला तुमचा सर्वांचा आशीर्वाद मतदानाच्या स्वरूपात हवा आहे. मी माझ्या मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक गावचा विकास करेल अशी ग्वाही दिली. त्यानंतर त्यांनी देवगिरी येथील मंदिरांना भेट घेऊन आशीर्वाद घेतला.