महिलांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी मोफत प्रशिक्षण उपक्रम
आपल्या समाजातील महिलांनी आत्मनिर्भर व्हावे याकरिता श्री विश्वकर्मा सेवा संघाने विश्वकर्मा समाजातील महिलांकरिता शिवण क्लास कम्प्युटर क्लास केक बनविणे मेहंदी क्लास इत्यादी शिक्षण मोफत देण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे.
रविवारी विश्वकर्मा सेवा संघाने श्री विश्वकर्मा महिला सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बहुमोल पाठिंबामुळे या उपक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी समाजातील महिलांनी पत आत्मनिर्भर व्हावे आणि भविष्यात आपले नाव उज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली
तसेच विश्वकर्मा समाजातील महिलांनी आणि युवतीने समाजाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती देखील यावेळी विश्वकर्मा संघाच्या वतीने करण्यात आली.