*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बालबोधिनी अंकलिपी प्रकाशन सोहळा व शैक्षणिक उपक्रम शुभारंभ*
असा संयुक्त कार्यक्रम गुरुवार दिनांक १३ जून २०२४ रोजी कावळे संकुल टिळकवाडी, येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस श्री मालोजीराव अष्टेकर रविकिरण प्रकाशनचे प्रशांत इनामदार नगरसेवक शिवाजी मंडोळकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकुश केसरकर होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
तसेच म . ए.युवा समिती *सचित्र बालबोधिनी* अंकलीपीचे प्रकाशन मालोजीराव अष्टेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच शैक्षणिक साहित्याचे वितरण प्रशांत इनामदार शिवाजी मंडोळकर व उपस्थितांच्या हस्ते करून शैक्षणिक उपक्रमाचे शुभारंभ करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना मालोजीराव अष्टेकर म्हणाले मातृभाषेतून शिक्षण काळाची गरज असून शाळा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, मागील काही वर्षे युवा समिती शाळांसाठी कार्य करीत असून त्यांच्या सारखे कार्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात सर्व स्थरावर सक्षम होतात त्यामुळे न्यूनगंड न बाळगता सर्व पाल्यानी मातृभाषेचा पर्याय निवडावा असे सांगितले.
श्री प्रशांत इनामदार यांनी आपण मराठी असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे कारण बऱ्याच संतांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी तलवार गाजवून मराठीची पताका अटकेपार पोहचली असून त्याच मराठीचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे असे सांगितले.
अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी मागील सात वर्षे युवा समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली व येत्या शैक्षणिक वर्षात जवळपास 300 शाळा व 5000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती दिली.तसेच लवकरात लवकर शाळांनी पहिलीच पटसंख्या द्यावी असे आवाहन केले.
यावेळी उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, तालुका प्रमुख मनोहर हुंदरे, खजिनदार विनायक कावळे, सूरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, इंद्रजित धामनेकर आशिष कोचेरि, आकाश भेकणे, साईराज जाधव, रोहित गोमानाचे, निखिल देसाई,महंतेश अलगोंडी, आश्र्वजीत चौधरी, भारत पाटील, अभिजित मजुकर, रितेश पावले, महेश जाधव, आनंद जाधव, प्रवीण धामनेकर सौरभ तोंडले, अक्षय बांबरकर, सुशील महांतुंगडे, सूरज चव्हाण, आदी उपस्थित होते,
सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी सूत्रसंचालन केले तर कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांनी आभार मानले.