*मराठी प्राथमिक शाळा नं. 5 चवाट गल्ली येथे शाळा प्रारंभोत्सवापासूनच शाळेची पटसंख्या वाढीसाठी Spoken English आणि संगणक शिक्षण (Computer education) चा अनोखा प्रयत्न*
दिनांक 31/05/2024 शुक्रवार रोजी शाळा नं 5 चवाट गल्ली येथे शाळा प्रारंभोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभोत्सवास पालक माजी विद्यार्थी संघाचे व sdmc पदाधिकारी आवर्जून हजर होते.
त्यानंतर झालेल्या मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, दीपक किल्लेकर, श्रीकांत कडोलकर आणि रवी नाईक तसेच SDMC च्या अध्यक्षा तुपारे मॅडम व सर्व शिक्षक वृंदांच्या बैठकीत शाळेतील पटसंख्या वाढीबाबत सविस्तर चर्चा झाली. शाळेतील पटसंख्या वाढीसाठी आणि दर्जेदार शिक्षणाच्या हेतूने यावर्षी सुरवातीपासूनच मुलांना इंग्रजी (Spoken english) आणि संगणक शिक्षण (Computer education) देण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री दीपक किल्लेकर यांनी या बैठकीत यावर्षी मुलांना इंग्रजी वाचन व बोलणे त्याचबरोबर संगणक (computer) साक्षरता निर्माण होण्यासाठी आपली ठाम भूमिका मांडली. त्यावेळी दररोज सकाळी स्पोकन इंग्लिश व शेवटच्या तासात शाळेमध्ये संगणक वर्ग (computer class) असे आश्वासन मुख्याध्यापक श्री मुचंडीकर सरांनी दिले. शाळेसाठी दोन नवीन computers ची देखील व्यवस्था करण्याचे श्री किल्लेकर यांनी मान्य केले.
सर्व पालकांना पटसंख्या वाढीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी.ए. माळी सर यांनी केले. आभार श्री राजू कांबळे सर यांनी मानले..