This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*वैभवी पिराजी सुतार हिचा चंदगड मराठी अध्यापक संघातर्फे गौरव*

*वैभवी पिराजी सुतार हिचा चंदगड मराठी अध्यापक संघातर्फे गौरव*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोवाड (प्रतिनिधी )दि.23 राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बुद्रुक या शाळेची विद्यार्थिनी कुमारी वैभवी पिराजी सुतार हिने दहावी बोर्ड परीक्षेत मराठी विषयात 95 गुण मिळवून यश संपादन केल्याबद्दल चंदगड मराठी अध्यापक संघातर्फे कथाकार बी. एन. पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्रीराम विद्यालय व व्ही.पी. देसाई ज्युनि कॉलेज कोवाडचे प्राचार्य एस.टी.कदम होते .

राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बुद्रुक या शाळेची शिपाई पिराजी मल्लाप्पा सुतार यांची ती कन्या आहे.
आज मराठी अध्यापक संघातर्फे तिचा सन्मान गौरव करण्यात आला .चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष व शाहू विद्यालयाचे मराठी भाषा विषय शिक्षक रवींद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभले .
तीचे सर्वत्र कौतुक होत आहे . यामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

मराठी अध्यापक संघ यांच्यातर्फे चंदगड तालुक्यातील इयत्ता दहावी परीक्षेत मराठी विषयात 95 गुण मिळवलेल्या विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचा सत्कार श्रीराम विद्यालय कोवाड येथे स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला .

यावेळी संजय साबळे , एम .एन. शिवणगेकर , वैजनाथ सुतार , एच .आर. पाऊसकर , एस.पी. पाटील व यासह तालुक्यातील मुख्याध्यापक , पालक व विद्यार्थी उपस्थित होते .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24