This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*जी एस एस पी यु काॅलेजमध्ये विद्यार्थी पालक मेळावा*

*जी एस एस पी यु काॅलेजमध्ये विद्यार्थी पालक मेळावा*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सालाबाद प्रमाणे या वर्षी ही जी एस एस काॅलेज मध्ये पालक मेळावा आयोजित करण्यात आला, विद्यार्थी आणि पालक यांना काॅलेजच्या व्यवस्थापन, नियमावली,अभ्यासक्रम,अभ्यासाव्यतरिक विद्यार्थी वर्गाने आपल्या कलागुणांना उजाळा देणे, काॅलेज जीवनात आपले लक्ष आणि ते पूर्ण करण्यासाठी प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास प्रामाणिक शिक्षण आणि त्या बरोबर अभ्यासात कमी मागं पडणार नाहीत या दृष्टीने दोहोचे मार्गदर्शन .

आजच्या स्पर्धात्मक युगात आपली पाल्ये कमी पडू नयेत ही प्रत्येक पालकाची इच्छा आहे, या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्यास योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मेन्टर रूपात प्राध्यापक नितांत ऊपलब्ध असतात याचा उपयोग विद्यार्थी वर्गाने कसा करावा, सर्वांगीण विकासासाठी तत्पर आसलेल्या विद्यार्थी वर्गाचसाठी मेन्टर चे सहकार्य महत्त्वाचे आहे.

काॅलेज परिसरात शिक्षणा व्यतिरिक्त इतर कलागुणांना वाव देणे आशा अनेक विषयाचा संदर्भात माहीती देण्यात आली.
वर्षीक कार्यक्रमाची पूर्ण माहिती, स्पर्धात्मक परीक्षांची पूर्व तयारी , अभ्यासात कमी पडणाय्रा विद्यार्थी वर्गाची विषेश तयारी,तसेच उत्कृष्ट विद्यार्थी मागं पडू नये याची विशेष दखल या बद्दल संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास जी एस एस पी यु काॅलेजच्या काॅलेज मॅनेजी कमिटीच्या अध्यक्ष श्रीमती लता ताई कितूर, प्राचार्य एस एन देसाई ,उपप्राचार्य सचिन पवार, भाषा विभाग प्रमुख प्रा डाॅ ए एस कोळी, प्रा. प्रविण पाटील, प्रा. विनायक कुलकर्णी उपस्थित होते.
पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी भाषा विभागाच्या सर्व प्राध्यापक वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24