गोवा येथे राष्ट्रीय खेळ प्राधिकरण टीएएफ् आयएकेएस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत येळ्ळूरच्या मराठी मॉडेल शाळेची कुस्तीपटूचे घवघवीत यश म्हापसा येथील पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गोवा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत बेळगाव, गोवा,केरळ, आंध्रप्रदेशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता.
यात कु.आराध्या भरमाण्णा हलगेकर हिने 32 किलो मध्ये प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक तसेच पारगड हेरिटेज रन मॅरेथॉन स्पर्धेत 600 स्पर्धक सहभागी होते त्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे तिला कुस्ती प्रशिक्षक श्री मारुती घाडी, क्रीडा शिक्षक श्री सतिश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल मराठी मॉडेल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व एसडीएमसी, पालक, विद्यार्थ्यांनी तिचा गौरव केला..