बेळगाव: 12 जुलै 2024 रोजी मराठा मंडळ संचलित सेंटर हायस्कूल मध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.व्ही.ए. हसबे होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सुरेल अशा इशस्तवनाने व स्वागत गीताने झाली. शाळेचे विद्यार्थी प्रतीक पाटील,आदित्य पाटील, नंदकुमार मुदगेकर यांनी शाळेबद्दल मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी नेहमीच गुरुजन व वडिलांचा आदर करावा. संस्काराची शिदोरी घेऊन नम्रपणाने आपली वाटचाल करावी.कारण संस्कारक्षम विद्यार्थीच देशाचं उज्वल भविष्य घडवू शकतात असे विचार कार्यक्रमाला प्रमुख व्यक्ती म्हणून लाभलेले मराठा मंडळ सेंटर हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री हेमंत मायाप्पा जळगेकर यांनी काढले.
व्यसनापासून दूर राहून आपले आयुष्य उत्तम घडावे तसेच संस्कारित शिक्षण घ्यावे असे विचार कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री प्रफुल शिरोळकर व श्री सचिन उसूलकर यांनी मांडले कार्यक्रमाला लाभलेले बाबा पालक कृष्णा साबंरेकर यांनी देह निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करा असा संदेश दिला. आई पालक सौ प्रेमा शिरोळकर यांनी मोबाईल पासून विद्यार्थ्यांना दूर ठेवणे ही काळाची गरज बनली आहे असे विचार व्यक्त केले.
शिक्षकांच्या वतीने शाळेचे जेष्ठ शिक्षक डी.टी.सावंत यांनी पालकांच्या जबाबदाऱ्या समजावून दिल्या. अध्यक्षीय समारोप करताना श्री व्ही.एस.हसबे यांनी शाळेची शिस्त व थोरांच्या मार्गदर्शनातून उत्तम आयुष्य घडवा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.के.फडके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डी.एम.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन एम.के.पाटील यांनी केले व टी.बी मास्तीहोळी यांनी सर्वांचे आभार मानले.