This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Crime

ट्रक कार अपघातात पाच जण जागीच ठार

ट्रक कार अपघातात पाच जण जागीच ठार
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ट्रक कार अपघातात पाच जण जागीच ठार

धारवाड नजीक पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना पादचाऱ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात भर धाव कारने समोरून येणाऱ्या ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बालकासह पाच जणांचा जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे या घटनेत अन्य जखमी झाले आहेत.

अपघातातील मृतांची नावे नागप्पा इराप्पा मुद्दोजी (वय 29), महांतेश बसाप्पा मुद्दोजी (वय 40, दोघे रा. अवरादी ता. कित्तूर), बसवराज शिवपुत्रप्पा नरगुंद (वय 35 रा. निच्चनकी), श्री कुमार नरगुंद (वय 5) आणि पादचारी ईरण्णा गुरुसिद्धप्पा रामनगौडर (वय 35 रा. हेब्बळ्ळी) अशी आहेत.

त्याचप्रमाणे गंभीर जखमी झालेल्यांमध्ये श्रवणकुमार बसवराज नरगुंद (वय 7), मडिवाळाप्पा राजू अळणावर (वय 23), प्रकाशगौडा शंकरगौडा पाटील (वय 22), मंजुनाथ महांतेश मुद्दोजी (वय 22) यांचा समावेश आहे त्यांच्यावर हुबळीतील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या अपघातात ठार झालेला पादचारी इराणा हा टेकूर जवळ मुल्ला धाबा येथे काम करत होता महामार्ग ओलांडत असताना तो अपघातात ठार झाला तर अपघातातून सैन्य दलात निवड झालेला मंजुनाथ मुद्दोजी हा सुदैवाने बचावला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24