जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील हेब्बाळ गावात गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसात वीज कोसळून अनके मेंढ्यांचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले.
या घटनेत हुक्केरी तालुक्यात गुरुवारी सायंकाळी वीज पडून एकाचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तसेच काही मेंढ्यांचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही बाब समजताच हुक्केरी तहसीलदारांनी भेट देऊन पाहणी केली.त्यानुसार हुक्केरी तालुक्यातील सोल्लापुर गावाजवळील पूणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी साचून राहिल्याने काही काळ रस्ता वाहतूक विस्कळीत झाली होती