This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*आरोग्य विभागाकडून बनावट दवाखान्यांवर छापा*

*आरोग्य विभागाकडून बनावट दवाखान्यांवर छापा*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव:जिल्ह्यात बनावट डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला असताना यावर  आळा घालण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने पावले उचलली असून, नागरिकांच्या तक्रारीनंतर मंगळवारी भडकलगल्लीतील दोन दवाखान्यांवर छापा टाकण्यात आला.

कित्तूर येथील बनावट डॉक्टर लाडखान प्रकरणानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाला असून, ज्याठिकाणी नागरिकांनी तक्रार केली तेथे संबंधित दवाखान्यांवर छापा टाकून बनावट डॉक्टरांवर ताशेरे ओढले आहेत.

जिल्ह्यातील बनावट डॉक्टरांवर कडी नजर ठेवून आरोग्य विभागाने शहरातील शिव क्लिनिक आणि गुरुकृपा हॉस्पिटलवर छापा टाकून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली.शिव क्लिनिकला नोटीस दिल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
बेळगावचे डीएचओ महेश कोणी, टीएच संजय दुम्मगोला, बेळगांव तहसीलदार यांनी या छाप्याचे नेतृत्व केले.

यावेळी बोलताना डीएचओ महेश कोणी म्हणाले की, ते भडकलगल्ली येथील शिवा क्लिनिक अशी नेमप्लेट लावून आत औषधी वितरीत करत आहेत.त्याच्याकडून मिळालेली नोंदणी बनावट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.डॉक्टर कुठे आहेत, असे विचारले असता येथील कर्मचारी ते शेतात काम करत असल्याचे सांगितले.शिवा क्लिनिकबद्दल लोकांनी जागरुक राहावे. या क्लिनिकबाबत तीन वर्षांपूर्वी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तेव्हा घेराव घालण्यात आला.आता जिल्हाधिकाऱ्यांकडे दुसरी तक्रार आल्यानंतर आम्ही पुन्हा जप्त केली आहे, असे ते म्हणाले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24