भरधाव कारने पुलाच्या संरक्षक कठड्याला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. बुधवारी मध्यरात्री हा अपघात घडला.
खानापूर जांबोटी मार्गावर हा भीषण अपघात घडला .भरधाव वेगात असणाऱ्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार पुलाच्या संरक्षक कठड्याला आदळली.ही धडक जोरात असल्याने कारचे इंजिन तुटून दूर पडले.कार चालक आणि अन्य एक जण जागीच ठार झाले .तर कारमधून प्रवास करणारे अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात मच्छे येथील शंकर (मिथुन) मोहन गोमानाचे (वय 25) व आशिष मोहन पाटील (वय 26) मुळगाव हत्तरवाड खानापूर, सध्या राहणार मच्छे, हे दोघेजण जागीच ठार झाले. तर या अपघातात निकेश जयवंत पवार (वय 25) मच्छे, याचा पाय गुडघ्यातून मोडला असल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला बेळगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
भरधाव वेगात कारने संरक्षक कठड्याला धडक दिल्याने अपघातग्रस्त कारचा चेंदामेंदा होऊन गेला आहे.त्यामुळे कार मधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना आणि मदतीला आलेल्या लोकांना बरेच कष्ट घ्यावे लागले.एका जखमींवर खानापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.खानापूर पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे.
D Media 24 > Crime > *अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी*
*अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी*
Deepak Sutar11/07/2024
posted on
Leave a reply