*मुसळधार वादळी पावसात बाचीतील गरीब शांता परशारम गावडे यांच्या घरावर भले मोठे झाड कोसळून पाच लाखाचे नुकसान : ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी केली प्रशासनाकडे मागणी : सुदैवाने जीवित हाणी टळली*
बेळगाव, तारीख 03 जुलै 2024 : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठ बेळगाव जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस सतत जोर केल्यामुळे विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली असून मोठे नुकसान झाले आहे. *बाची , बेळगाव तालुक्यातील बाची या ग्रामीण भागात असणाऱ्या गावांमध्ये वयस्कर गरीब आजीबाई श्रीमती शांता परशराम गावडे आणि मोहन परशराम गावडे यांचा घरावरती भले मोठे झाड वृक्ष कोसळून 5 लाखाचे नुकसान झालेले आहे.* तरी प्रशासनाने ताबडतोब या घडलेल्या घटनेकडे पाहून ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रदेशात आणि विविध तालुक्यात जोर दिसून आला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ठिकाणी मोठमोठे झाडे कोसळून घरांचे नुकसान झालेले दिसून येत आहे तर रस्त्यावरील झाडे कोसळून वीज खांबे आणि यासह अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये रात्रीपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी नुकसान झाले असून सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. काही झाडे घरावरती पडून घरच्या खापऱ्या भिंती आणि पत्रे यासह मोडून लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.
बेळगाव शहर आणि तालुक्यातील विविध परिसरात याचा मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतो आहे. सततच्या पावसामुळे जोर वाढलेला असून मोठमोठे वादळ वाऱ्यामुळे झाडे कोसळून पडलेली आहेत. *बाची , बेळगाव तालुक्यातील बाची या ग्रामीण भागात असणाऱ्या गावांमध्ये वयस्कर आजीबाई श्रीमती शांता परशराम गावडे आणि मोहन परशराम गावडे यांचा घरावरती भले मोठे झाड वृक्ष कोसळून 5 लाखाचे नुकसान झालेले आहे.* तरी प्रशासनाने ताबडतोब या घडलेल्या घटनेकडे पाहून ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
यावेळी अनेक ठिकाणी मोठमोठे झाडे घरावर पडली तर काही रस्ते व खांब्यावरती पडली त्यामुळे वाहतूक येण्या-जाण्यासाठी ठप्प झाले तर काही ठिकाणी विजांच्या खांद्यावरती पडून विज खांबे मोडले. तरी विविध ठिकाणी घडलेल्या या प्रकारांना ताबडतोब प्रशासनाने लक्ष घालून सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या समस्येतून सोडवून त्यांना न्याय द्यावा व नुकसान भरपाई देऊन सहकार्य करावे असे शेतकरी आणि जनतेतून मागणी होत आहे.