This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Crime

*अंधाचे पाकीट मारणारा दोन महिन्यांनी गजाआड*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अंधाचे पाकीट मारणारा दोन महिन्यांनी गजाआड

बेळगाव :मध्यवर्ती बसस्थानकावर बसमध्ये चढताना अंध विद्यार्थ्यांचे पाकीट व मोबाईल चोरणाऱ्या तरुणाला मार्केट पोलिसानी रविवारी (दि. ५) अटक केली. शैलेश सुरेश तरकार (वय २८ रा. संकेश्वर) असे त्याचे नाव आहे.

 

त्याच्याजवळून मोबाईल संच जप्त करण्यात आला आहे. घटनेनंतर दोन महिन्यांनी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. शैलेशला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

२७ ऑगस्ट २०२३ रोजी बसमधून आपल्या गावी जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकावर पोचलेल्या गळतगेतील (ता. निपाणी) येथील आतिष कोरगद या अंध विद्यार्थ्याचा मोबाईल व पाकीट पळविण्यात आले होते. त्या पाकिटातील रक्कम पळविण्याबरोबरच एटीएम कार्डचा वापर करून २९,९०० रुपये काढण्यात आले होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24