2000 रुपयांची नोट बदलण्याचा अंतिम आठवडा
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याची किंवा बँकेत जमा करण्याची अंतिम मुदत काही दिवसांवर आली आहे. आरबीआयने शनिवार, ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली असून देशवासियांसाठी हा अंतिम आठवडा असणार आहे. बहुतांश ग्राहकांनी आपल्याकडील २,००० रुपयांच्या नोटा आधीच जमा केल्यामुळे बँक शाखांमध्ये सध्या गर्दी दिसत नाही. तथापि, काही नोटा अजूनही चलनात असल्यास त्या जमा करण्यासाठी आणखी पाच-सहा दिवसांचा अवधीच शिल्लक राहिला आहे.
आरबीआयने ३० सप्टेंबर २०२३ ही २,००० रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची. शेवटची तारीख ठरवली आहे. मात्र, या मुदतीत वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चलनातील २,००० च्या सर्व नोटा कमी करण्याच्या उद्देशाने आरबीआयने १९ मे रोजी देशवासियांना यासंबंधी महत्त्वाचे निवेदन जारी केले होते. आतापर्यंत या चलनी नोटांपैकी ९३ टक्के नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्या आहेत.
l2vc6c
z38kyx
7o8jga
hs8ewk