बेळगाव: आपल्या कुटुंबाचे डेंग्यू पासून रक्षण करा. हे सांगा एआयसीसी मानवाधिकार बेळगाव जिल्हा यांच्यावतीने डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पावसाळ्याला सुरुवात झाली असून बेळगाव मध्ये डेंग्यू सारख्या आजाराचा मोठा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
याकरिता आज एआयसीसी मानव अधिकार संघटनेच्या वतीने काळी अंबराई येथील शिवबसवा गर्ल्स पी जी हॉस्टेलमध्ये डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली. डेंग्यू प्रतिबंधक लसीकरणाचा 80 हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
यावेळी आयसीसी मानवाधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राघवेंद्र नायडू, महिला विभागच्या उपाध्यक्ष सौ रक्षा उपाध्ये, सपना नायडू,भुविका होसेट्टी उपस्थित होत्या.
हे औषध होमिओपॅथिक असून डेंगूच्या तापाकरिता उपयुक्त आहे डेंगू चा ताप हा एक वेदनादायक व दुर्बल विषाणूजन्य रोग आहे तो सात ते दहा दिवस टिकतो हे औषध त्याच्या सक्रिय घटकांसह रोगाची लक्षणे कमी करण्यास मदत करतो.