वारणासी येथील स्थानिक न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरांमध्ये पूजाविधी करण्यास परवानगी दिल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी आज बेळगावात एसडीपीआय बेळगाव शाखे तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलन छेडण्यात आले. यावेळी निषेधाच्या घोषणा देत जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी जो निकाल देण्यात आला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे फक्त मुसलमान नाहीतर कोणत्याही हिंदू हा निकाल मान्य करणार नाही बाबरी मशीद वगळता स्वातंत्र्यानंतरच्या 15 ऑगस्ट 1947 च्या कायद्यानुसार 1991 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक कायदा बनविला होता .
त्यानुसार कोणतीही मशीद चर्च मंदिर अशी प्रार्थना स्थळे आपापल्या जागी सुरक्षित असतील त्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही असे स्पष्ट केले होते.
मात्र आता ज्ञान वापी मशीद येथील स्थानिक न्यायाधीशाने दुर्लक्ष केले आहे असा आरोप एसडीपीआयच्या सदस्यांनी केला. आणि जोरदार निदर्शने केली