बेळगाव: हुबळीतील कर्नाटक राज्य कायदा विश्वविद्यालय आणि के एल इ संस्थेचे बीवी बेलद कायदा महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिर 2023-24 चे उद्घाटन बेळगाव तालुक्यातील हिंडलगा गावामध्ये शुक्रवारपासून झाली सुरुवात.
कायद्याची जागरूकता आणि परिसर संरक्षण बद्दल विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन करून करून बोलताना बेळगाव येथील भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. डी.एन मिसाळे बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एनएसएस शिबिर हे महत्त्वाची भूमिका बजावते. यामधून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभावनाची वृत्ती तयार होते.
कायद्याच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावी जीवनात वकील व्यवसायासोबत समाजसेवेत सक्रियपणे सहभागी व्हावे. व समाज बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी सूचना त्यांनी केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.वी.बेल्लद कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ज्योती हिरेमठ बोलताना म्हणाले की बेल्लद कायदा महाविद्यालया दरवर्षी बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात एनएसएस घेत असते. सामाजिक कार्यक्रमासोबत नागरिकांना कायद्यासंदर्भात जनजागृतीच्या कामात सक्रिय सहभाग घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्षा मीनाक्षी हित्तलमणी, उपाध्यक्ष चेतना आगसेकर, सहायक प्राध्यापक मंजुनाथ अल्लाप्पा उपस्थित होते.