This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

State

*पीओपी गणेश मूर्तींना बंदी न घालता गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदन*

*पीओपी गणेश मूर्तींना बंदी न घालता गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री सतीश जारकीहोळी, आमदार राजू शेठ, आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हा अधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांना निवेदन देऊन श्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळवच्या कार्यकारणी सदस्या नी निवेदन देऊन आपल्या समस्या सोडवण्यासाठी केली विनंती*

 

बेळगाव तारीख एक जुलै 2024 ( प्रा . एन. एन. शिंदे बेळगांव) : दरवर्षाप्रमाणे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने मूर्तीकारांसाठी विशेष पुढाकार घेतला आहे. महामंडळ पदाधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री सतीश जारकेहोळी तसेच बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि बेळगाव जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे या विविध अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात आपले म्हणणे मांडले.

मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने विशेष पुढाकार घेऊन बेळगाव येथील गणेश उत्सव अतिशय व्यवस्थित पार पडण्यासंदर्भात तसेच पीओपी गणेश मूर्तीच्या संदर्भात विविध विषयांच्या वरती चर्चा करून प्रशासनाला विविध विषयांच्या वरती माहिती देण्यात आली. तसेच पीओपी मूर्तींच्या संदर्भात प्रशासनाने प्रकल्प राबविण्यासाठी व राबवण्याची मागणी केली आहे. बेळगाव गणेशोत्सव हा शहर व ग्रामीण परिसरात परंपरेनुसार अतिशय मोठ्या उत्साहात थाटात होत आलेला आहे याच्यात शंकाच नाही. हिंदू धर्मातील सर्वात मोठे आराध्य दैवत म्हणून संबोधले जाणारे श्री गणेश गणपती हा सण भक्तांचा सर्वात मोठा उत्सव मांडला जातो. गणेश उत्सवाच्या काळात विविध सर्वधर्मीय एकत्र येऊन अतिशय आनंदात हा उत्सव साजरा केला जातो. बेळगाव आतील गणेशोत्सवाची परंपरा 100 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे. या चळवळीच्या पाठीमागे स्वातंत्र्य लढा यशस्वी होण्याकरिता लोकमान्य टिळक यांनी पहिल्यांदा बेळगाव मध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रेरणा दिली आणि तेव्हापासून हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात होत असतो. परंपरेनुसार बेळगाव मधील अनेक मूर्तिकार श्री गणेशाच्या आकर्षक मुर्त्या बनवतात. हे एक कलाकृतीचे प्रतीक आणि अविष्कार म्हणावा लागेल. बेळगाव शहर हे एक सध्याच्या काळात बेळगाव शहर व परिसराला हा उत्सव म्हणजे लाभलेला एक वैभवच आहे. काही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा गणेशोत्सवाच्या शाडू मातीच्या मुर्त्या बनवल्या जात होत्या आणि त्या आजतागायत परंपरा ही जोपासली जात होती. शाडूच्या मुर्त्या देखील बनवल्या जातात. पण मूर्तीसाठी लागणारी माती मिळणे हे अत्यंत कठीण झाले आहे. सध्याच्या काळात माती मिळणे फार कठीण झाले असून दिवसेंदिवस कठीण होत चाललेले आहे व मूर्तीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे मूर्तिकर हा पीओपी चा आधार घेऊ लागला आणि गणेश मुर्त्या बनवण्यासाठी पीओपी चा आधार घेऊन आता त्याकडे मूर्तिकार वळला आहे. महानगरपालिकेच्या वतीने विसर्जनाच्या आधी आठ ते दहा दिवस मानवनिर्मित कुंडा त , तलावात पाणी भरले जाते व विसर्जनानंतर आठ ते दहा दिवसांनी निर्माण निर्माल्या सहित पाणी रिकामे केले जाते. प्रदूषणाचा धोका जर भेडसावत असेल तर पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विघटन करून ते पुन्हा रासायनिक खत म्हणून उपयोगात आणण्याचा उपक्रम देखील वेगवेगळ्या योजनेतून उपक्रमातून राबविला जातो आणि ते राबवित असतात; त्याचा प्रशासनाकडे पाठपुरावा व अभ्यास करून जनतेला सहकार्य करावे. बेळगाव हा कलाकृतींचा आणि कला अविष्कारांचा एक मोठा कलावंताचा प्रदेश म्हणून ओळखला देखील जातो या ठिकाणी वेगवेगळे कलावंत कलाकार मूर्तिकार विविध माध्यमातून आपली कला सादर करत असतो. मूर्तिकार देखील आपली कला तो गणेश मूर्तींच्या विविध तेतून गणेश मूर्ती निर्माण करतो त्यातून मिळत असलेला थोडाफार अर्थसाह्य आपल्या उदरनिर्वाचा अविभाज्य बनवून तो जीवन जगत असतो आणि छोटे-मोठे जीवनाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आर्थिक सहाय्य हे वेळोवेळी मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते पण हल्ली दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आणि त्यावर नवनवीन आखले जाणारे नियोजन तंत्रज्ञान तसेच मातींची कमतरता यामुळे पीओपींचा आधार घेत तो गणेश मूर्ती हल्ली तयार करत आहे. मूर्ती करांच्या मूर्तिगारांच्या वर्षभराचा उदरनिर्वाचा प्रश्न आहे प्रत्येक मूर्तिकाराकडे कामगार वर्ग व महिला कामगार वर्ग देखील काम करत आहेत हे नाकारून अजिबात चालत नाही त्यांचं कुटुंब त्यांचं अर्थार्जण होणही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी मूर्तिकारांच्याकडे विविध कामगार देखील काम करत असतात. त्यांचा देखील उदरनिर्वाह होणे अत्यंत महत्त्वाचा आहे. पण त्यांच्या देखील उदरनिर्वाचा मोठा प्रश्न आम्हाला भेडसावत आहे. याचा प्रशासनाने विचार करावा आणि यावरती सुकर मार्ग काढावा सर्वसामान्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा कलावंतांना कलाकारांना मूर्तीकरांना न्याय देऊन त्यांना त्यांच्या उदरनिर्वाचा प्रश्न सुटण्यासाठी विविध उपाय आखून प्रशासनाने तोडगा काढावा असे निवेदन यावेळी देण्यात आले.

बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री सतीश जारकीहोळी, आमदार राजू शेठ, आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हा अधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांना निवेदन देऊन श्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळवच्या कार्यकारणी सदस्या नी निवेदन देऊन आपल्या समस्या सोडवण्यासाठी विनंती केली.

यावेळी चर्चे प्रसंगी रणजीत चव्हाण पाटील, रमाकांत कोंडुसकर , विकास कलघटगी, सतीश गौरगोंडा, सागर पाटील,मूर्तिकार विनायक मनोहर पाटील, मूर्तिकार विक्रम जे. पाटील, मूर्तिकार रवी लोहार, मूर्तिकार संजय मस्के, मूर्तिकार रवी चीत्रगार- चित्रकार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24