बेळगाव:जमात ए इस्लामी इस्लामी हिंद बेळगाव यांच्यावतीने 1 ते 30 सप्टेंबर या दरम्यान महिलांच्या विरोधात होणाऱ्या अत्याचाराविरोधात आणि नैतिक स्वातंत्र्याबाबत जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या जागृती अभियानाचा मुख्य उद्देश हा कोणत्याही जाती धर्मपंथांमध्ये भेदभाव न ठेवता प्रत्येकाला समान स्वातंत्र्य देणे आणि नैतिक स्वातंत्र्य देणे असल्याची माहिती जमात ए इस्लामी हिंद च्या राज्य सल्लागार समितीच्या सदस्या साजिदा लालमिया यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली.
त्या शांती संदेश सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होत्या.
या जागृती अभियानाबाबत अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, सध्या देशभरामध्ये महिलांच्या विरोधात होत असणाऱ्या हिंसा शारीरिक अत्याचार लैंगिक शोषण तसेच हत्या अशा विविध प्रकारच्या वाढत्या अपराधांबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. भारतीय समाजामध्ये महिलांच्या बाबतीत असलेले सामाजिक असमानता स्त्री द्वेष याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. खासकरून आदिवासी अल्पसंख्यांक आणि विकलांग महिलांच्या विरोध होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी चिंता व्यक्त केली.
त्या म्हणाल्या एनसीआरबी आणि एनएफएचएस यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात प्रतिवर्षी वाढ होत आहे. तसेच दाखल न झालेल्या गुन्ह्यांची संख्या याहून अधिक आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एडीआर यांच्या रिपोर्टनुसार सध्याच्या 151 खासदारांच्या विरोधात महिलांविरुद्ध अत्याचार केल्याबाबत गुन्हे नोंद दाखल झाले आहेत.
महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे देशाच्या विकासावर आणि देशाच्या शांततेवर प्रभाव पडत आहे.