बेळगांव ता 29.खादरवाडी येथील येथील मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळेत मेजर ध्यानचंद पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका वनश्री नायर यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे सह शिक्षक प्रमोद ढेरे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीची माहिती दिली व क्रीडा दिनाचे महत्त्व सांगितले. आणि नुकत्याच्या झालेल्या स्पर्धेमधे विजयी झालेल्या खेळाडूंचे प्रमाण पत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी क्रीडाशिक्षक पै. अतुल शिरोले,मनोज बिर्जे,ओमकार जयानाचे सह सर्व शाळेचे शिक्षक,कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते.