*श्री राम युवक मंडळ राजहंस गल्ली अनगोळ या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ 2024 सालची कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आली.*
*अध्यक्ष* : उमेश बाळू कुर्याळकर
*उपाध्यक्ष* : मारुती सुरेश हुंदरे,
आनंद जगन्नाथ चौगुले
*सचिव* : नागराज दत्ता सुळगेकर,
हेमंत तानाजी जाधव
*उपसचिव* : सुदर्शन अनिल जाधव,
श्रीनाथ मनोहर लाटूकर
*खजिनदार* : स्वप्निल अशोक पाटील,
सौरभ अशोक परमोजी
*उपखजिनदार* : निखिल नंदू सुरुतेकर,
अक्षय शेखर मुधोळकर
*कार्याध्यक्ष* : प्रीतम प्रकाश पाटील,
मयूर अशोक पाटील
*उपकार्याध्यक्ष* : हरी नागेश लाटुकर,
सुशील शेखर मुधोळकर
*हिशोब तपासणी* : मदन जाधव, बाळू मुचंडीकर, श्रीकांत कुर्याळकर, संदीप लाटुकर, शिवाजी जाधव, रोहन सुळगेकर, राहुल परमोजी
या मंडळाची स्थापना. १९६९ साली झाली. यावर्षी या मंडळाला 56 वर्ष पूर्ण होतात, तसेच या आजच्या झालेल्या युवा कार्यकारी मंडळाला सलग 14 वर्षे पूर्ण होतात.
या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भरपूर असे सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवलेले आहेत, ते म्हणजे,
पीडित व गरजू लोकांसाठी या मंडळाकडून 400 ते 500 कार्यकर्ते दरवर्षी आपले रक्तदान करतात,
या मंडळाकडून दरवर्षी अनगोळ मधील सर्व शाळेतील गरीब व गरजू मुलांसाठी शालेयउपयोगी वस्तू देण्यात येतात.
या मंडळाचा मुख्य उद्देश हा आहे की आपला संपूर्ण समाज व्यसनमुक्त होऊन एकत्रित यावा, याकरिता या मंडळांने आपल्या मंडळाच्या जमाखर्चातून उरलेली रक्कम वापरून एक उत्कृष्ट अशी व्यायाम शाळा देखील तयार केलेली आहे. तसेच या मंडळाकडून दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, व इतर क्रीडा स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते, तसेच इतर कलागुणांना वाव देण्यासाठी गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा व रांगोळी स्पर्धा देखील घेतल्या जातात,
खास करून महिलांकरिता “होम मिनिस्टर” असी पैठणी पटकविण्याची स्पर्धा देखील भरवण्यात येते.
या मंडळाला भरपूर वेळा उत्कृष्ट श्री गणेश मूर्ती, उत्कृष्ट देखावा असे पुरस्कारही मिळालेले आहेत.
🚩 गणपती बाप्पा……🚩
🚩 मंगलमूर्ती…………🚩