बेळगाव , प्रतिनिधी: बीएसएनएल बेळगाव आणि फायर ब्रिगेड कर्नाटक राज्य तसेच फायर ब्रिगेड बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी फायर अवेअरनेस आणि फायर डिझास्टर याबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी डी मीडियाशी बोलताना बीएसएनएलचे डिव्हिजनल इंजिनियर गुरुप्रसाद देशपांडे म्हणाले, गुरुवारी बीएसएनएलच्या आवारामध्ये फायर ब्रिगेड बेळगाव यांच्यावतीने या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आग लागल्यानंतर कशाप्रकारे त्याचा मुकाबला केला पाहिजे आणि स्वतःचे रक्षण कसे करावे याबाबत जनजागृती करण्यात आली. आग कशी आटोक्यात आणावी नुकसान कसे टाळावे तसेच कमीत कमी नुकसान कसे होईल याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी जागृती केली. गुरुवारी 29 रोजी अशा प्रकारची जागृती संपूर्ण राज्यात करण्यात आली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी बेळगावात बीएसएनएल आणि फायर ब्रिगेड बेळगाव यांच्यावतीने या जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे प्रात्यक्षिके सादर करून आग कशी वीजवावी याबाबत जागृती केली.
यावेळी डी मीडियाशी बोलताना फायर ब्रिगेड बेळगावचे अधिकारी शिवाजी कोरवी म्हणाले, चार प्रकारच्या वेगवेगळ्या आ आगी असतात .त्या कशा विझवाव्यात याची ट्रेनिंग आमच्या कर्मचाऱ्यांना दिलेले असते. यामध्ये ए क्लास बी क्लास सी क्लास डी क्लास अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आग प्रकार असतात. हे प्रात्यक्षिक सादर करतेवेळी फायर ब्रिगेडचे कर्मचारी, बीएसएनएलचे कर्मचारी, बीएसएनएलचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.