संत मीरा शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा.
बेळगांव ता 29. अनगोळ येथील येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत मेजर ध्यानचंद पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे क्रीडामंत्री समीक्षा बुद्रुक हिने मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीची माहिती दिली, तर शाळेच्या मुख्यमंत्री आलिया पठाण हिने क्रीडा दिनाचे महत्त्व सांगितले याप्रसंगी क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट यश पाटील , शिवकुमार सुतार शालेय क्रीडामंत्री आश्विन जायण्णाचे सोहेल विजापुरे अनिरुद्ध हलगेकर, नीरज घाडी, वेदांत अनगोळकर ऐश्वर्या शहापूरमठ, भावना बेर्डे, समीक्षा खन्नूरकर , प्रणिता बडमंजी आदी उपस्थित होते