**बेळगाव साहित्य परिषदेच्या वतीने शरद पवार यांना ग्रंथतुला नागरी सत्कारासाठी निवेदन**
दि. 02 सप्टेंबर 2024 रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव शाखेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना ग्रंथतुला नागरी सत्कारासाठी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे पवार साहेबांनी आपल्या अतुलनीय कार्याचा सन्मान करण्यासाठी वेळ आणि उपलब्धता कळवावी, अशी विनंती केली आहे.
साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील आणि जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी हे निवेदन सादर केले. या प्रसंगी शिवसंत संजय मोरे, एम वाय घाडी, संजय गुरव, आणि बजरंग पाटील हे देखील उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षांत परिषदेने बेळगाव येथे यशस्वीपणे साहित्य संमेलने आयोजित केली आहेत आणि मराठी अस्मितेसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. यापुढेही परिषदेच्या कार्यात शरद पवार यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.