बेळगाव प्रतिनिधी
गोकाक तालुक्यातील ममदापूर गावात भीषण खून झाल्याची घटना घडली आहे. रात्री मंदिरातील भजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मंदिराच्या कट्ट्यावर झोपलेल्या एका व्यक्तीचा त्याच गावातील एका व्यक्तीने शेत जमिनीच्या वादातून ऊस तोडण्याच्या कोयत्याने मानेवर प्राणघातक वार करून भीषण खून केला आहे. त्यामुळे गोकाक तालुक्यासह संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात खळबळ माजली आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव मद्दाप्पा यल्लाप्पा बनाशी वय 47 असे असून तो रात्री मंदिरात भजनाचा कार्यक्रम संपूर्ण मंदिराच्या कट्ट्यावर झोपलेला असताना सदर खुनाची घटना घडली आहे. अधिकृत सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार श्री बीर सिद्धेश्वर मंदिर येथे रात्री भजनाचा कार्यक्रम झाला होता.
तेथेच ही घटना घडली आहे. घटनेनंतर जखमी अवस्थेमध्ये <span;>मद्दाप्पा<span;> यल्लाप्पा <span;>बनाशी<span;> याला बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचाराचा फायदा न झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.