बेळगाव:येथील अपटेक एव्हिएशन हॉस्पिटलिटी अकॅडमी येथे प्रशिक्षण पूर्ण करुन हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सांबरा विमानतळाचे डेप्युटी डायरेक्टर मॅनेजर ऑपरेशन प्रमुख प्रतापराव देसाई उपस्थित होते.
वैभव भोसले व सुहाना प्रजापती या दोघांची हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर निवड झाली आहे तसेच त्यांनी लवकरच विमानतळावर कामाकरिता रुजू होणार आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाची प्रशंसा व त्यांचा सन्मान करण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रतापराव देसाई यांच्या हस्ते वैभव भोसले व सुहान प्रजापती यांच्या कुटुंबीयसह पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रतापराव देसाई आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की अकॅडमी ही विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करतात.व विमानतळावर कार्य करण्यासाठी पूर्णपणे त्यांना सक्षम बनवितात. तसेच विमानतळ नेवीगेशन या विषयासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी aptech aviation academy व्यावसायिक भागीदार विनोद बामणे, सरस्वती इन्फोटेकच्या मॅनेजिंग डायरेक्टर ज्योती बामणे,व्यवस्थापक फैजल सर,विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.